STORYMIRROR

Bhushan k

Others

4  

Bhushan k

Others

गजरा

गजरा

1 min
447

इवलीशी चिमणा चिमणी

जमलं त्यांचे लग्न

चिव चिव करत दाणे टिपत

संसारात होते मग्न


उंच आकाशात चिमणा

फडफड उडायचा

आपल्या राणीसाठी

दाना दाना जमवायचा


तिच्या प्रेमापोटी तो

रोज आणे गजरा

व मग म्हणे तिला

तुझ्यामुळेच दिसतो साजरा


हळूहळू त्यांनी

जमवली काडी

उंच वृक्षावर

त्यांनी बांधली माडी


एके दिवशी चिमणी

म्हणे चिमण्याला

येणार आपल्या घरी

नव्या पाहुण्याला


चिमणा बिचारा आपला

विचारात रे दुबळा

काय म्हणे चिमणी राणी

समजेना त्याला


चिमणीला पण मग

होऊ लागले डोहाळे

खात बसायची

चिंच अन् आवळे


चिमणा आपला म्हणायचा

खाऊ नको आंबट-तुरट

दिसायला अगदीच नाजूक तू

बसशील सर्दीने फुरफुरत


एक-दोन करत

नऊ महिने सरले

अचानक या किल्ल्यात

दोन पिल्ले अवतरले


चिमणा-चिमणी आता

होते खूप आनंदी

त्यांच्या संसाराची

सुरुवात झाली स्वच्छंदी


गच्च गच्च पिशव्या भरून

चिमणा आणायचा खाऊ

आपल्या दोन पिलांना

चिमणी भरायची खाऊ


सगळं कसं होतं

आनंदाने माखलेलं

त्या दोघांमध्ये

आता चौघांनी सजलेल


एके दिवशी चिमणा

उडत उडत गेला

टपोरे टपोरे दाणे पाहून

शिकारीत मेला


त्या दिवशी सायंकाळी

घरी तो आलाच नाही

चिमणी व्याकुळ होऊन

इकडे तिकडे पाही


पण तिला खरं

काहीच माहीत नव्हतं

आपलं कुंकु

शिकाऱ्याने पुसलं होतं


आकाशात पाहात ती

सारखी रडायची

अन् आपल्या दोन पिलांना

उराशी धरायची


सारख वाटते तिला

येतील ते लवकर

मग म्हणतील प्रिये

खा आता भाकर


दररोज रात्री तिला

तो दिसायचा

डोळे उघडले की

तो मात्र नसायचा


हळूहळू करत

आकाशात घेतली भरारी

आपल्या पिलासाठी झाली

ती झाली सबळ नारी


तिचे लहान पिले

आता खूप मोठे झाले

त्याचे पण तिने

दोनाचे चार हात केले


सगळं कसं

चांगलं होतं

पण धन्याशिवाय

तिचं मन जवळ नव्हतं


अजून वाटतंय तिला

येईल माझा साजण

आणून त्या सुंदर चोचीने

गजरा तो मालवण


Rate this content
Log in