STORYMIRROR

santosh bongale

Others

2  

santosh bongale

Others

पाहुण्या मागून पाहुणे

पाहुण्या मागून पाहुणे

1 min
14.1K


श्यामने बांधले एक 

भले टूमदार नवे घर 

लोक म्हणाले आता 

लेका वास्तुशांति कर 

बघितले पंचांग आणि 

ठरवली की हो तारीख 

प्रत्येक गोष्टीवर घरच्या 

लक्ष होते त्यांचे बारीक 

मुहूर्ताचा दिवस आज 

उजाडला हो लवकर 

आचाऱ्याला सांगितले 

स्वयंपाक पटपट कर 

पहिला आला पाहुणा 

बसवला लगेच जेवायला 

तृप्त होऊन उठला की 

दुसरा बसला जेवायला 

पुन्हा आला तिसरा 

बसवला लगेच जेवायला

तृप्त होऊन उठला की 

चौथा बसला जेवायला 

पुन्हा आला की हो पाचवा 

बसवला लगेच जेवायला

तृप्त होऊन उठला की 

सहावा बसला जेवायला

पुन्हा आला की हो सातवा 

बसवला लगेच जेवायला

तृप्त होऊन उठला की 

आठवा बसला जेवायला 

पुन्हा आला की हो नववा 

बसवला लगेच जेवायला

तृप्त होऊन उठला की 

दहावा बसला जेवायला 

(श्रोते कंटाळून म्हणू लागले 

अहो किती पाहुणे येतील 

नाहीतर आमच्या घरचे येऊन

आम्हाला उचलून नेतील )

पाहुण्या मागून पाहुणे 

आज घरी येतच राहतील 

स्वयंपाक संपला की सारे 

आपोआप माघारी फिरतील 


Rate this content
Log in