STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

5.0  

Meenakshi Kilawat

Inspirational

सबलनीष्ठा

सबलनीष्ठा

1 min
14.5K


झेप तिच्या कर्तृत्वाची पृथ्विवरच नसून

ती उंच आकाशातही भरारी घेतेय

या सृष्टीची सर्वात सुंदर अशी निमिर्ती

तिचा देह जरी हा नाजूक दिसतोय.

स्त्री ही केवळ प्रेमिका नाही किंवा

बायकोच नाही मित्रच नाही 

तर ती इंद्रधनूच्या सप्त रंगाप्रमाणे

स्त्रीच्या सत्वशील सबलनीष्ठा आहे.

तिच्या अंगी चौसष्ठकला कामिनी

सात्विकता मर्मभेदाची ती वाणी 

अगाध शक्ती-भक्ती कर्तृत्व करून

संसाराप्रती अफाट ममत्वाची ती जननी

रुजलेले बी कधीतरी अंकुरते मातीतून

मागासलेली हतबल ती झालेली असते

कधी उफाळते अंधारक्षण वेचूनीया

अवहेलनेचा बारूद भरून ठेवलेली असते

स्त्री ही म्हणजे केवळ वृक्षच नाही

आधारावर वाढणारी केवळ फांदीच नसते 

तर चपळतेनं दणाणून सोडणारी

ती अस्मानातील विद्युल्लताही असते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational