STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

चल मित्रा चल...

चल मित्रा चल...

1 min
14.3K


चल मित्रा चल.. आले दिवस ढकल

नको खावूस जगणे तुझे अनमोल 

भेद सारे खोल , मनगटात तुझ्या जोर 

विचार कसला करतोस भामटे सारे बुकल - बुकल

चल मित्रा चल.. संपवू नकोस जीवनयात्रा 

धीर नको सोडूस ,हटव सारी स्वार्थी जत्रा

रातीनंतर तर बघ दिवसच असतो 

ग्रहणानंतरच नेमाने सूर्य चमकतो ...

चल मित्रा चल.. गुपित सारे उकल...

कमजोर , लाचारास नसतो कधीच भाव ....

कुणी हिरावला घास तुझा , त्याला एकदा बुकल

लढव काहीतरी शक्कल , शोध सारे बेअक्कल ...

ओसाड माळरान फुलवून तूच मोती पिकवतोस

हक्काच्या वाट्याला का मग कचरतोस ?

शोधून काढ लबाड सारे .. बिनधास्त त्यांना बुकलं

जीवनयात्रा संपवुन होऊन नकोस कधीच बेदखल ...

 

चल मित्रा चल...ओळख  भेद सारे , घुमजाव

रुम्हण्याचा हिसका आता तू दाव

वेळ नको दवडू ,खाऊन जा भाव

मनगटातली ताकद तुझ्या तुलाच हाय ठाव


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational