STORYMIRROR

Nagsen Bhosale

Inspirational

3  

Nagsen Bhosale

Inspirational

नमो शिवाजी राजा..

नमो शिवाजी राजा..

1 min
14.1K


नमो शिवाजी राजा, वंदन श्री शिवराया

स्वराज्याची घेऊनि शपथ

आलो चरण स्पर्शाया...

स्वराज्याचे आम्ही मावळे, छावा मर्द मराठी

सोसूनी प्रहार निधड्या छातीवर

देऊ प्राणाची आहुती...

श्वास श्वास लढला

शौर्यगीत उमटले

मायभुचे गुण वर्णाया

स्वराज्याची घेऊनि शपथ, आलो चरण स्पर्शाया...

हर हर महादेवाची ठोकतो आरोळी

गर्जत बरसू शत्रूवर, कधी आकाशी कधी जळीतळी

रक्ताने रचू स्वर्ण इतिहास

यशाचे दीपक तेजवू वादळवेळी

वाघनख्यांचा करुनि प्रहार

मिटविली शत्रूची काया

स्वराज्याची घेऊन शपथ,आलो चरण स्पर्शाया......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational