STORYMIRROR

Nagsen Bhosale

Romance

3  

Nagsen Bhosale

Romance

राहून गेलं

राहून गेलं

1 min
28.2K


धपकन प्रेमात पडताना

तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं

तोंड दुःखेपर्यंत बडबडताना

हवं ते सांगायचं राहून गेलं

ती हो म्हणेल की नाही

की देईल मुस्कटात एक

हा अशुभ विचार करता करता

हवं ते घडायचं राहून गेलं

नुसताच बघत बसे मी

तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये

तिच्या डोळ्यात स्वतःला शोधताना

माझ्याविना तीच अडायच राहून गेलं

तिच्या ओढणीभरल्या खांद्याचा

स्पर्श हवाहवासा वाटतो

'सांगेन तिला कधीतरी' म्हणताना

बोलायचं राहून गेलं

प्रत्येक भेटीनंतर ती निघताना

घालमेल होई या जीवाची

त्या दिवशीही निघाली ती

अन तिला अडवायच राहूनच गेलं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance