STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

सर्वंकष क्रांती

सर्वंकष क्रांती

1 min
14.1K


लेखणीच्या टोकावर प्राण घेऊन, बुद्धि सामर्थ्य, प्रतिभेच्या जोरावर ...

लेखणी हाती घेऊन जेव्हा सरसावतील अनेक हात 

सर्वंकष क्रांती घडेल तेव्हाच... पेटून उठतील ते खऱ्या अर्थाने

लेखणी आपली होईल देखणी तेव्हाच गडे सर्वार्थाने.

व्हावी कधी निष्प्रभ वाणी जशी ,अचानक गोठावी तशी शाई

लेखणी माझी हताश होते कधी- कधी टिपण्यास सर्वकाही..

बळ मिळावे फक्त तेव्हा, लेखणी सिद्ध व्हावी साकारण्या शिवशाही ..

पुन्हा नव्याने तत्पर व्हावी लेखणी होण्यास उत्तराई सर्वार्थाने

इमान विकणाऱ्या अन विकत घेणाऱ्या बांडगुळांच्या दंडेलशाहीत

नैतिकतेच्या पडझडी, अराजकतेकडे झुकलेल्या माझ्या देशात

भ्रष्टाचार, बेकारी, महागाईने पोखरलेल्या युद्धसदृश्य काळात ..

लोकशाहीचा आधारस्तंभ होण्यास झिजावी , सिद्धहस्त व्हावी लेखणी

अनैतिकतेच्या पाठीवर आरूढ होऊन सत्तेचा माज चढलेल्या धेंडांना 

दाखवावीच आपली शक्ती अन नेस्तनाबूत करावी लागेल ही अनिर्बंध सत्ता

नुसते कागदी घेडे नाचविणे अन चॅनलवर झळकल्याने देशाचा विकास कसा होईल?

युद्ध नको बुद्ध हवा हेही लेखणीच ठरवेन काढील हुकूमशाही पून्हा करून सर्वंकष क्रांती  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational