गुरुवंदना...
गुरुवंदना...
गुरू म्हणजे...
संस्कारांची शिदोरी,
दृढ होई आयुष्याची दोरी.
गुरू म्हणजे...
अनुभवांची खाण,
समाजात असे त्यांना बहुमान.
गुरू म्हणजे...
विश्वास अन् वात्सल्य,
वसे त्यांच्या अंगी मातृरूपी मांगल्य.
गुरू म्हणजे...
अंधारातल्या कापराला छेदणारा दिवा,
सदोदित दावी आशेचा किरण नवा.
गुरू म्हणजे...
ज्ञानाचा उगम अन् अखंड वाहणारा झरा,
प्रकाशमय करी जीवन दूर करी अंधारा.
गुरू म्हणजे...
साक्षात भगवंत,
रूपे त्यांची अगाध अनंत.
गुरू म्हणजे...
निस्सीम श्रद्धा अन् भक्ती,
राहो सदा ओठी माझ्या तुझ्या नामाची किर्ती.
