नको हा अबोला
नको हा अबोला
नको हा अबोला
सोड ना गं आई,
तुझ्याविना मला
एक क्षण सुद्धा करमत नाही
तू धरला हा अबोला
आता कुणा म्हणू मी आई,
कोण म्हणेल माझ्यासाठी
आता गोड ती अंगाई
काय होती माझी चूक
सांग ना गं आई,
माझे मन आता
मलाच खाई
तुझ्याविना नसे माझ्या
जीवनाला अर्थ काही,
आता तरी सोड अबोला
माझ्या प्राणप्रिय आई
