छंद विठूरायाचा...
छंद विठूरायाचा...
छंद लागला या मनी,
विठूरायाच्या चरणी.
टाळ मृदंगाचा घोष,
अंगी सान-थोर जोष.
पाय चालती पंढरी,
मुखी राम कृष्ण हरी.
नाम घेता विठ्ठलाचे,
नाश होईल षड्रिपूंचे.
नसे तिथे जात- पंथ,
अवघा तिथे साधू संत.
सावळी ती सुंदर मूर्ती,
भक्त सारे दर्शन घेती.
विठू माझा कृष्ण सावळा,
कर कटीवरी,भाळी गंध टिळा.
गाऊ विठ्ठल किर्तन,
होई सद्विवेक परिवर्तन.
अशी विठ्ठलाची थोर महती,
शब्दही माझे अपुरे पडती.
