आर्त स्त्री मनाची
आर्त स्त्री मनाची
आर्त स्त्री मनाची
ऐक तू मानवा,
का बरं वागतोस असा
परि त्या वानवा
ती मुलगी आहे,ती बहीण आहे,
आहे ती आई, आहे ती बायको,
परिस्थितीच्या ओघाप्रमाणे
होतोस का तू सायको
देवळात जाऊन करतोस
देवीची तू आराधना,
पण समाजातल्या स्त्रीची करतोस
अघोर,बिभित्स विवंचना
थांबव मानवा आता हे
स्त्री- पुरुष भेदांतर,
परस्त्री मातेसमान मानून
कर तू तिचा आदर
