खारुताई...
खारुताई...
1 min
280
खारूताई गं खारूताई,
इवलीशी तू चपळ बाई ,
इकडे तिकडे फिरत राहून,
कंटाळा कसा येत नाही.
शेपूट तुझे झुपकेदार,
पाहायला आवडते वारंवार,
राहायला आवडते तुला
उंच उंच झाडांवर.
रामायणात होता तुझा खारीचा वाटा,
इवलासा तुझा जीव किती गं छोटा
असाल जरी लहान तरी सहकार्य करण्याचा
तू संस्कारमंत्र दिला मोठा.
