झाड झाड लावताना
झाड झाड लावताना
झाड झाड लावताना रान हिरवे होते,
रानातल्या पानातून हिरवे गाणे गाते
गाणे ऐकताना माझे मन पाखरू होते,
हलणा-या फांदीतून एक झोका घेते
पाखरू मन कधी झ-यातून न्हाते,
आभाळाच्या निळाईत दूरवर जाते
झाड लावताना माझे झाडांशी नाते,
मोहरल्या बनातून चिंब चिंब होते
