भारत देश महान
भारत देश महान
भारत माझा देश आहे
नाव ओठी आलं तरी,
नसानसांत स्फुरण चढते
अभिमान वाटे हा ऊरी.
भिन्न जाती भिन्न भाषा
भिन्न मतांची मन सारी,
विविधतेतून एकता साधू
दृढ करू माणुसकीची दोरी.
स्वातंत्र्याची मशाल हाती
समतेची करू वारी,
अन्यायाला वाचा फोडून
समृद्ध करू दुनिया सारी.
