STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational

3  

Jyoti gosavi

Inspirational

होऊ दाते

होऊ दाते

1 min
261

एक धान पेरलं तर

 त्याचं होतं हजार धान

 माणूस निसर्गापासून 

 कधी घेणार हे ज्ञान


 एक झाड लावलं तर

 फळ आणि सावलीदेतं

 माणूस त्याच्यापासून 

का नाही काही घेत 


मुंग्या एकत्रित येऊन  

मोठे वारूळ बांधतात

 संकट आलं की त्याच्याशी

 एकत्रितपणे भांडतात

 माणसे त्याच्यापासून का

 नाही थोडा बोध घेतात


 नेहमी घेते, होऊ नका

 कधीतरी होऊया दाते

 एकत्रित येऊन सारे

 वारू या संकटाते


वादळ झाली, पूर आला

 आली जगात महामारी

 एकत्रितपणे लढलो तर

 होऊ सगळ्यांना भारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational