STORYMIRROR

अक्षय वरक

Inspirational Others

3  

अक्षय वरक

Inspirational Others

कविता कवीची

कविता कवीची

1 min
308

    मनात दडलेल्या भावनांचा,असह्य झालेल्या       वेदनेंचा,

   घोट या विशाचा घेऊन , समोरच्याला विचार        पटवून देणे,

    हे काम काय सोपे नाही......।


    विचारांची कलाकृती , अन अंगी असलेली        कवितेची वृत्ती,

   एकाग्रता करून साचलेली अशी तल्लीन झालेली    ही बुद्धी,

   अंतर मनाची, अन् बाह्य मनाची केलेली शुद्धी,

   कवितेत उमटवणे हे काम काय सोपे नाही.....।


     लेखनाचे घेतलेले मानसिक कष्ट,

    डोक्यातील सुजलेल्या नसा,मेंदूला उठलेले फोड,

    हे कोणालाच दिसून येत नाही,

     शब्दांची फोडणी करून, त्याची योग्य मांडणी       करणे,

    हे काम काय सोपे नाही.....।


   अंधार स्वीकारून केलेली उपासना, कित्येक वर्षे     केलेली तपस्या,

   त्यातून निर्माण झालेली कल्पना, एकाग्रता करून     मनाची,

   सर्व ज्ञानांद्रिये एकरूप करून स्वतः ची,कवितेत     उमटवणे,

    हे काम काय सोपे नाही....,

   कवितेतून कवी, अन् कवीतून कविता            एवढ्याच....शब्दात ,

   मला मांडने अन सांगणे सोपे नाही......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational