STORYMIRROR

अक्षय वरक

Action Inspirational

4  

अक्षय वरक

Action Inspirational

युद्ध हे पुकारते....

युद्ध हे पुकारते....

1 min
313

एकटा हा तू जगती तुला आता लढायचे 

मनी चिंता भय मग कशाचे  

आक्रोश हा वेदनेचा चहूबाजूस पसरवायचे 

युद्ध हे पुकारते रणी आता निघायचे 

 

अंत हा तुजा जाणून घे मग भय कशाचे 

वाटा विरळ साऱ्या जगती  

तुला तुज्याशीच लढायचे 

युद्ध हे पुकारते रणी आता निघायचे 

 

ठेवुनी संयम बांध योजनेचे बांधायचे 

ध्यानी ठेव तुला एकटाच लढायचे 

साऱ्या संकटांचे बांध तुला ओलांडायचे 

युद्ध हे पुकारते रणी आता निघायचे 

 

एकटाच तू रणात हार नाही रे मानायचे 

मेहनतीच्या जोरावर तुला रणांगणात उतरायचे 

हसेल ही सारी दुनिया तू नाही... नाही रे रडायचे 

युद्ध हे पुकारते रणी आता निघायचे 

 

हरेल असे वाटेल तुला शिवराय रूप आठवायचे 

शिव आदर्श ठेवुनी तू युद्ध हे लढायचे 

संपेल सारा झिजूनी देह तरी लढण्यास तुला उरायचे 

युद्ध हे पुकारते रणी आता निघायचे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action