STORYMIRROR

अक्षय वरक

Romance Fantasy Thriller

2  

अक्षय वरक

Romance Fantasy Thriller

दुरावा

दुरावा

1 min
31

पावसाच्या ऋतूत पाहिले मी तुला  

काय करू काय नाही समजेना मला  

भाळला गं मला तुजा साधेपणा  

पाहताच तुला मला मीच दिसेना  

चालतोया वाट बघ एकलाच जगी  

तुजविण मज आता कोणीच गं नाही  

सोबतींचे दिस बग गेले ते सरून  

राहिलेत दिस हे आठवणींत रडून  

पाहत होतो तुला नजर चोरून  

चोरट्या नजरेन थोडस लाजून  

शब्द माझे आज मलाच कळेना  

लिहितोय तुला हे तुलाच कळेना  

लेखणी ही माझी बघ लिहितेय तुला  

उरलेच नाही भान कसलेच मला  

कसली ही दुरी कसला हा दुरावा  

अतरंगी माज्या उठलाय प्रेमवारा  

आठवणींचे वादळ छळतेय मला  

भावना ह्या माज्या कळतील का तुला  

वेळ तुजा मला देशील का गं थोडा  

प्रेमात तुज्या बघ मी झालोया वेडा  

तुज्यासारखी सखे जगी कोणीच गं नाही  

असल्या ह्या जगी मज तू दिसलीच नाही  

सावळा गं वर्ण माजा सावळा गं रंग  

जीवनप्रवसात माज्या तू येशील का संग  

सांगना गं तुला कळतेय ना सर्व  

होउदे ना सुरू नवे प्रेमाचे पर्व  

भावना ह्या माज्या कवितेत लिहिल्या  

कळतील ना गं तुला पाहिल्या पाहिल्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance