STORYMIRROR

अक्षय वरक

Fantasy Inspirational Thriller

3  

अक्षय वरक

Fantasy Inspirational Thriller

पाहिले मी माझे पंख छाटताना

पाहिले मी माझे पंख छाटताना

1 min
169

पाहिले माझे मी स्वप्न तुटताना त्यांना राख होतांना  

माज्या कल्पनेचे विश्व सारे क्षणभरात संपताना  

थांबवाना कोणी हा माजा घात हो झाला  

पाहिले मी माझे पंख छाटताना  

  

घेतले ते बळ मी दाखविले ते शौर्य मी  

दाखवूनी शौर्य ते... पायरी यशाची चढताना  

झाला हो झाला माजा घात बघा झाला  

पाहिले मी माझेच पंख छाटताना  

  

घेतली मी भरारी अवघे आसमंत पाहिले  

दाविले ते शौर्य मी पाठिंबा नसताना  

प्रत्येकी नेत्री माजे द्वेष उभे राहिले  

पाहिले मी माझे पंख छाटताना  

  

जीव नकोसा झाला जीव कोरडा पडला  

पाहिले मी त्यांना बाणांचा वर्षाव करताना  

एक बाण छातीत आरपार होऊन गेला  

पाहिले मी माझे पंख छाटताना  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy