STORYMIRROR

अक्षय वरक

Tragedy Inspirational Thriller

3  

अक्षय वरक

Tragedy Inspirational Thriller

अंधाऱ्या रातीला...

अंधाऱ्या रातीला...

1 min
117

ह्या अंधाऱ्या रातीला नाही आधार सुखाचा ,

उरी बैसला डोंब हा दुःखाचा....


घनदाट अंधार दाटला

आलाय माज्या वेशीला

घोर लागला जीवाला 

तळमळ झाली यां रातीला

ह्या अंधाऱ्या रातीला नाही आधार सुखाचा ,

उरी बैसला डोंब हा दुःखाचा....


जीव तळमळला प्राण संपत आला

कैसा रे देवा तुजा कोप झाला

दिसाचा बी देवा काळोख झाला

कैसा हा भोग नशीबाचा...

ह्या अंधाऱ्या रातीला... रातीला....

ह्या अंधाऱ्या रातीला.


संसार सोन्याचा संपत आला

तरी बी देवा आस होती मनाला

घेण्या भरारी आसमंती काय हे घडले देवा

पाहिले मी माझे पंख छाटताना देवा पंख छाटताना

ह्या अंधाऱ्या रातीला नाही आधार सुखाचा ,

उरी बैसला डोंब हा दुःखाचा....


काळाचा उद्रेक झाला

पाषाण हृद्यावरी आला

श्वास माझा घुटमळला

देवा जीव माझा कोंडला...कोंडला

देवा जीव माझा कोंडला

ह्या अंधाऱ्या रातीला नाही आधार सुखाचा ,

उरी बैसला डोंब हा दुःखाचा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy