STORYMIRROR

अक्षय वरक

Fantasy Thriller

3  

अक्षय वरक

Fantasy Thriller

जन्म एक प्रश्नचिन्ह?

जन्म एक प्रश्नचिन्ह?

1 min
170

जन्माचं कोड उलघडत नाही   

जन्म का असावा समजत नाही   

जिवंत मृत्यूचा खेळ संपत नाही   

एकट्यास जगणे सोपे नाही   

   

मृत्यूची अनोखी ही प्रित   

दुःखाचा रात्रंदिस जागर   

संपत नाहीत हे दिस   

जगी जीवनी अश्रूंचा हा सागर  

  

उगीच फिरत राहतो वणवण  

पाहण्या हे जीवन  

जीवन मृत्यूच्या ह्या फेऱ्यात  

जीव कोरडाच राहीन  

  

जन्म म्हणजे कळेलच नाही  

सखे सोयरे साथ सोडून जाई  

आस्वाद घेण्यास सुखाचा  

जीव तळमळून जाई  

  

श्वासाशिवाय राहतोय प्राण  

उगी व्यर्थ जातोय हा जन्म  

हृदय अन मनाचाच इथे द्वंद्व  

म्हणूनच जन्म एक प्रश्न चिन्ह ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy