माझा पांडुरंग...
माझा पांडुरंग...
पांडुरंग पांडुरंग लागला रे तुजाच छंद
सखा तू माझा , माझा पांडुरंग...
पांडुरंग पांडुरंग.... | | धृ | |
भजनात येई माझा पांडुरंग
अंतरंगी दिसती मग भगवंत
जडलाय आम्हा तुझा रे छंद
आत्माराम गातो माझा पांडुरंग | | १ | |
भाव भक्तीची भाकर मिळली
चिंता उद्याची आजच सरली
गोड लागते भाकर भक्तीची
ऊब मिळाली आम्हा मायेची | | २ | |
मी पणाचा लोभ सरला
धन्य झालो पाहून श्री हरीला
टाळ ढोल नि विना मृदुंग
सारेच बोले पांडुरंग पांडुरंग | | ३ | |
चालवितोय जग कारभार
पंढरीत उभा पांडुरंग
भागवताचे निशाण भगवे
घेऊनि उभा पांडुरंग | | ४ | |
पांडुरंग पांडुरंग लागला रे तुजाच छंद
सखा तू माझा , माझा पांडुरंग...
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.... माझा पांडुरंग.. | |