परी पावसाच्या धारा (०२)
परी पावसाच्या धारा (०२)
परी पावसाच्या धारा तुज्या जीवनी आला एक नवा वारा
आला आला वारा तुज्या जीवणी एक नवा तारा
टीमटीम चमके बघ तुजा तारा माज्या वाहतात धारा
खोटखोटे वचन तू दिलेस कशाला माज्या प्रेमाच्या नात्याला
सांगे मेघराजा मी आलो तुज्या सोबतीला...
परी पावसाच्या सरी मी तुज्या सोबतीला...
पावसाच्या सरी झुळझुळ वाहू गं लागल्या
क्षण आले गं बहरूनी बघ माज्या आठवणींना
क्षण भंगुर जाहले क्षण....क्षण विझून गं गेले
क्षणभरातच क्षण सारे संपूनच गेले
परी पावसाच्या धारा मला देतात विसावा
परी पावसाच्या धारा मला जीवनाची वाट जरा दावा
झाला माज्या जीवनाचा पोरखेळ सारा
आला आला बघ रिमझिम वारा, सांगे रिमझिम वारा
पावसाच्या सरी सांगे वाहुनी जा, तू झुळझुळा...
थेंब थेंब साठुनी बघ बनेल एक तळे
सांगे पावसाच्या सरी , पण मला काहीच न कळे
परी पावसाच्या धारा पडे गार बर्फ गारा
पडे गार बर्फ गारा माज्या नेत्री अश्रूंच्या गं धारा
देतात सहारा मला देतात किनारा
परी पावसाच्या धारा...परी पावसाच्या धारा....

