STORYMIRROR

अक्षय वरक

Children Stories Comedy Children

3  

अक्षय वरक

Children Stories Comedy Children

आला आला पाऊस

आला आला पाऊस

1 min
175

आला आला पाऊस चल भिजूनीया घेऊ ,

उनाड अशा पावसात फिरून आपण येउ.

हिरवेगार रान केले पावसाने सारे ,

इकडे तिकडे जातात का ? हे वेडे वारे.

सोड सोड वारे हे, आपण फिरायला जाऊ,

उनाड अशा पावसात फिरून आपण येऊ..

झाला इथे चिखल चल उडी मारू,

मारताच उडी आपण घसरून जाऊ.

अंग आपले माखले चिखलाने सारे,

पावसाच्या सरीमध्ये चल न्हाऊ नारे.

तो बघ मोर पिसारा त्याचा गोल,

थाई थाई नाचतो किती सुंदर तो मोर.

चल मोरया संगे नाचूया,

पाऊस गाणे गाऊया.

चल चल आता चिऊ ताईला रे पाहू,

उनाड अशा पावसात फिरून आपण येऊ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन