शिकस्त जीवनाची
शिकस्त जीवनाची
शांत झाली धरती आले भेटाया वरुणराज
अनुपम्य सोहळा चालला दिनरात हा सरताज
वर्षाकाठी एकदा धरणी माय पावन झाली
पोशिंदा जगाचा आत्मी तृप्त झाला
परंतु घडले आक्रित कोसळली दुःखाची दरड
वाहून गेले आसवांचे महापूर आली मनाला मरड
आयुष्याचा झाला चिखल फुटला बांध
का रे निसर्गा इतका निष्ठुर झाला तू अंध
दिस एक पुरे जाहला ढिगाऱ्याखाली
तरी नाही पोहोचले बचावकार्य स्थळी
खचली जमीन खचली घरे खचली मने
येईल का हो पुन्हा उभारी पीडितांच्या अंतर्मनी
झाले उध्वस्त संसार पडली मुलेबाळे उघड्यावर
ओसरला पुर पण नाही ओसरला आसवांचा उर
सैन्य तैनात सुरू होते आपत्कालीन व्यवस्थापन
झाले होत्याचे नव्हते पसरले दुःखाची कंपन
बहरू दे आसमंत तुझ्या कर्तृत्वाने हीच आस्था
पुन्हा एकदा कर तू प्रयत्नांची पराकाष्ठा
उमलू दे शक्तीचा सुगंध दरवळू दे पारिजात
पुन्हा एकदा लढ तू ढाल करुनी आयुष्याची
नको करू शोक अनावर येईल धावत हा करकटी
नकोस हारू हिम्मत तू विश्वास तुझा मनगटी
झटक जळमटे मनाची त्याग तो आळस
तूच होशी विश्व विजेता सकलांचा कळस
