पाऊसपाणी
पाऊसपाणी
1 min
357
पावसाची ही गम्मत न्यारी
वाटते मौज भारी
बाळगोपाळ होई आनंदी
भिजण्याचा भागवी छंद
सानुल्या सानुल्या होड्या पोहती जळी
जणू मोठाली गलबते जवळी
येई उधाण मनाला जसे भरते समिंदराला
छप छप पडती पाऊले उडे पाणी अंगाला
बहरला पारिजात शहारले अंग
कडाडले नभ ओथंबली संग
दाटती पारव्या छटा सळसळती बिजली
अंतरंगी नभिच्या कोणता सोहळा साजणी
पल्लवीत पाने, फुले अन् वेली
मिरविती दिमाख जशी माहेरवाशिणी
