बाल्यावस्था
बाल्यावस्था
1 min
230
शांतचित्त नवल बालक ते कोमल |
सानुला गाली खुदकन हसे छान ||
निरागस ओतप्रेत |
भरुनी राहे हृदयी मम् साचार ||
सुखद वाटे ती हळुवार लाथ |
उर भरून येई उचंबळे वात्सल्य ||
अर्भक गोड चित्तवेधी |
तासन् तास माय पाहे निरखुनी ||
अबोल ते चिमुकले |
पाही कीलकीले नयन करोनी ||
संभ्रमावस्था तरीही घेई ओळख पटवोनी|
थांग ना लागे कुणास त्याचीया मनीचा ||
सुहास्य वदन कुंतल रुळती भाळी |
इवलेसे ते ओठ गुलाबी सांगू पाहे प्रेमभरे||
नयनरम्य सोहळा तो घेई अंतर्मनात साठवोनी |
स्मित हास्य मोहक सुंदर चिरकाल स्मरणी ||