कृष्ण जन्म
कृष्ण जन्म
श्रावण वद्य अष्टमीस, कळी काळ निशाचरी |
घनघोर वादळी रात्र, अभिजीत नक्षत्र चांदण ||
नवचैतन्य कोंदून मोहरुन येती |
सकल चराचराचा सारथी, अबोलतेने जन्म घेती ||
तुरुंगात घडले अघटीत, वध कराया कंसाचा |
आले उदयास बालक, सुकुमार चंचल ||
सुखे निद्रा घेई द्वारपाल, कपाटे उघडती चमत्कारे |
आली भरती, उचंबळे वात्सल्य यमुना फुत्करे ||
करती आनंदी आनंद सोहळा |
रुप धारण पाही सृष्टीचे, हृदयात चर्र होई सकळा ||
घेताच चरण वंदन गोविंदाचे, सरती प्रवाह होई शांत ||
अद्भुत संगम हा मात्र, पहावया वासुदेव ठरला भाग्यवंत ||