पहिली सर
पहिली सर
1 min
241
कोसळती जलधारा छेडी तार रुपेरी
भिजली माती भिजली मने आल्या ह्या धुंद सरी
भिरभिरती वारे भिरभिरल्या नजरा चातक लावी आस
तिष्टत दारी हा भुमिसेवक पाही निसर्गाची कास
अंकुरले कोंब अंकुरल्या भावना अन् वाणी
रुदन त्या कैवल्याचे राही क्षणभर अन् दीर्घकाळ आठवणी
सळसळली पाने सरसरला वारा येता कानी
गुंजारव अन् किलबिल ही होता चिंब स्पर्श रानी
सुन्यासुन्या वाटा सुने अंतर ही गमे
तुझ्या स्पर्शाने होई पुलकित नववधू समे
