STORYMIRROR

सई दंडगव्हाळ

Others

4  

सई दंडगव्हाळ

Others

स्वामी

स्वामी

1 min
199

स्वामी तुम्ही तन मनात जसा तन्मणी गळ्यात

जपतो तुझे हे नाम जसा हनुमंता ठायी राम


स्वामी तुम्ही पालनकर्ता जैसा गणेश विघ्नहर्ता

होतो नतमस्तक आशिस नित द्यावा हस्तक


स्वामी तुम्ही कणाकणात जैसे प्रल्हादास नरसिंह स्तंभखांबात 

असते प्रतिमा अंतरी जैसे वैद्याप्रती धन्वंतरी


स्वामी तुम्ही आण-बाण-शान जसे सैनिकाप्रती देशाचा मान

घेई सामावून सानथोर जशी माऊली सर्वांची दोर


स्वामी तुम्ही हृदयनाथा जशी तुकारामांची गाथा

आयुष्य तुमचे मार्गदर्शक उद्धरी पामरास रोमहर्षक


स्वामी तुम्ही सत्वगुणी आम्ही मात्र रजोगुणी

तरी कृपा करी निर्गुणी असा हा भक्त शिरोमणी


स्वामी तुमचे देशाटन नकारात्मकतेचे उच्चाटन

बीज सकारात्मकतेचे नाते आत्मीयतेचे


Rate this content
Log in