STORYMIRROR

Kiran Ghatge

Inspirational

3  

Kiran Ghatge

Inspirational

माझी शाळा

माझी शाळा

1 min
211

शिक्षणाचा ध्यास होता

   शाळा माझी श्वास होता

खाकी चड्डी, पांढरा शर्ट

   क्षण तेव्हा खास होता

मधली सुट्टी झाली जेव्हा

   मित्रांच्या डब्यातला घास होता

खुप यायचा पाऊस जेव्हा

   शाळा बुडवायचा चान्स होता

शिक्षणाची वाढली गोडी

   शिक्षकांचा खंबीर तास होता

झाला उशीर शाळेला की

   हाताला छडीचा त्रास होता

निकाल आमचा लागे जेव्हा

   कुणी ढकलपास पास होता

शाळेने मज दिला आधार 

   जेव्हा अडचणींचा फास होता 

शिकून चांगला माणूस झालो 

   लाभला शिक्षकांचा सहवास होता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational