STORYMIRROR

Kiran Ghatge

Others

3  

Kiran Ghatge

Others

राहुन गेले

राहुन गेले

1 min
214

मायेच्या कुशीत निजायचे राहुन गेले   

ममतेच्या धारेत भिजायचे राहुन गेले

मी शोधतो तुला आजूबाजूलाच अजुन  

उच्चार शब्द 'आई' ओठातच राहुन गेले

झेलले दुःख,वादळांना एकटाच असता   

आधार तुला होताना पहायचे राहुन गेले

चुकलो काही वाटा जीवनात चालताना  

थोडे तुझे मलाही सावरायचे राहुन गेले

जातो कधी खचुन, मनास चाळताना   

दुःख ते मनाचे तुला सांगायचे राहुन गेले

गेली अशी दुर तु ते फुल उमलताना   

डोळे भरून तुला बघायचे राहुन गेले 


साहित्याला गुण द्या
लॉग इन