STORYMIRROR

Kiran Ghatge

Others

3  

Kiran Ghatge

Others

वेडे व्हावे

वेडे व्हावे

1 min
385

ध्येयासाठी वेडे व्हावे     

इतिहासाचे धडे व्हावे 

उधळून द्यावा वारू ज्ञानाचा     

जगास साऱ्या कोडे व्हावे 

झिजुन ज्यांनी मोठे केले     

त्या मायबापांचे जोडे व्हावे 

जमले नाही मदत कराया    

कशास वाटेत धोंडे व्हावे

वाहुन गेले संसार त्यांचे 

पावसाने?

इतके वेडे व्हावे

आधार होऊन दुर्बलांचा     

माणुसकीचे घडे व्हावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन