STORYMIRROR

Kiran Ghatge

Others

2  

Kiran Ghatge

Others

व्यक्त झालो मीही जेव्हा कवितेमधूनी

व्यक्त झालो मीही जेव्हा कवितेमधूनी

1 min
31

खोटे वागणे मला कधी जमले नाही मी कसा हे दुनियेस कधी कळले नाही   

करून पाहिली सुख दुःखांची गोळा बेरीजतरी आयुष्याचे गणित कधी जुळले नाही   

सावलीसम ती असते सोबत म्हणुनी आठवणींनी तिच्या कधी छळले नाही    

तू कश्यास चिंता करतो इतकी मित्रा मैत्रीमधे रुसवे फुगवे कधी टळले नाही    

व्यक्त झालो मीही जेव्हा कवितेमधूनी घाव मनाचे पुन्हा कधी भळभळले नाही


Rate this content
Log in