STORYMIRROR

Kiran Ghatge

Inspirational

3  

Kiran Ghatge

Inspirational

माणुसकीची किनार झालो

माणुसकीची किनार झालो

1 min
290

संकटावर सवार झालो 

   संघर्षाचा विचार झालो 


हक्कासाठी लढलो जेव्हा 

   एकजुटीचा एल्गार झालो


सोडुन आलो माझेच सारे 

   प्रेमात तुझ्या दिलदार झालो 


सोडून गेले सगळेच जेव्हा 

   माझाच मी आधार झालो


वाट समतेची धरली जेव्हा 

   माणुसकीची किनार झालो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational