STORYMIRROR

Kiran Ghatge

Tragedy Fantasy Inspirational

3  

Kiran Ghatge

Tragedy Fantasy Inspirational

साधं सरळ आयुष्य

साधं सरळ आयुष्य

1 min
121

साधं, सरळ आयुष्य जगावं म्हणतो

  किती सुंदर असतं ते बघावं म्हणतो


निसटून गेल्या त्या क्षणाक्षणांच्या 

  आता पुन्हा आठवांत रमावं म्हणतो


पुरे झाली फरफट आयुष्याची आता 

  डोकं टेकवून निवांत बसावं म्हणतो


खुप जिंकल्या कसोट्या जिंदगीच्या

 आता पुन्हा प्रेमात तिच्या हरावं म्हणतो


थकून गेलो वाटेवरूनी चालताचालता

  सवलीस झाडाच्या थोडं थांबावं म्हणतो


सोडून द्यावे वाटते सारे हेवेदावे अन् 

  पुन्हा मैत्रीच्या दुनियेत जावं म्हणतो


यंत्रासारखे वागणे सोडून आता

  पहिल्यासारखं जगून पहावं म्हणतो


मोबाईल, कॉम्पुटरची सोडून दुनिया 

  निसर्गाच्या सान्निध्यात रहावं म्हणतो



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy