STORYMIRROR

Kiran Ghatge

Drama Romance Tragedy

3  

Kiran Ghatge

Drama Romance Tragedy

प्रेम खरे अन परखड होते

प्रेम खरे अन परखड होते

1 min
149

नको त्या विषयावर सुरू तिची बडबड होते

शांत राहू की बोलू माझीही मग गडबड होते


सुर माझा मी जरासा जपूनच लावतो आता 

हुकला तर मग प्रकरण फारच अवघड होते


ती नसली की, स्वतंत्र असतो भारत माझा 

अचानक ती समोर आली की धडधड होते


हल्ली बरीच कामे उरकून घेतो न सांगता 

राहिले एखादे तर भांड्यांची खडखड होते


रुसवे फुगवे वाढवतात गोडी जगण्यातली 

नाहीच झाले तर भावनांची मग परवड होते


संयम,अबोला,कटाक्ष रंग असती नात्यांचे

म्हणूनच बहुधा प्रेम खरे अन परखड होते


क्षण आनंदाचे जात असतात निसटून काही

राहिलेले थोडेच जपण्याची मग धरपड होते



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama