STORYMIRROR

Kiran Ghatge

Inspirational

3  

Kiran Ghatge

Inspirational

दुःख मनाचे

दुःख मनाचे

1 min
396

दुःख मनाचे सांगण्यासाठी       

का? शोधत रहावे कान 

आयुष्य जगताना आपणही       

फक्त उलटत रहावे पान


येतंच असतात संकटं असंख्य      

म्हणून किती घ्यायचा ताण 

थोडे आपण झालो खंबीर जरी      

निघतंच असतो मार्ग छान


होतंच असतात चुकासुद्धा    

सहनही करावा लागतो अपमान 

क्षणही काही येतात आनंदाचे    

मिळतही असतो तेव्हा मान


वाटा असल्या कितीही खडतर     

कष्टाचे असावे सतत भान

अहंकारास सारून बाजूस     

स्वाभिमानाने असावी ताठ मान


जीवन असे अनमोल काही     

सुखदुःखाची असते खाण

ठरवून घ्यावे ज्याचे त्याने     

जीवनाची काय असते शान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational