कं...ट्रो...ल!
कं...ट्रो...ल!
भावनांना वेढलेली ना तुफाने पाहिली
ना कधी मी अंतरंगी तोफखाने पाहिली
अंक होते चाललेले भावनांचे नाटकी
नाटकें मी रंगलेली ती उभ्याने पाहिली
चोचल्यांना रंग सारे फासले ती रंगली
नाटके ती भावनांची ह्या मनाने पाहिली
रंगमंची लोभ आला संग झाले बोलके
खंत त्याला लागलेली ती सुडाने पाहिली
राग पोटी थांबला जो काल ओठी रंगला
पोटजागी थांबलेली ती स्मशाने पाहिली
आसवांच्या निर्मिती ला कारखाने बांधली
भावनांना सोलणारी ती दुकाने पाहिली
प्रेम रूपी बंधनांनी तार जाळी आणली
पात्र सारी बांधलेली कुंपणाने पाहिली
