STORYMIRROR

Yogesh Khalkar

Inspirational

3  

Yogesh Khalkar

Inspirational

पाऊस

पाऊस

1 min
177

पाऊस मोठ्या मनाचा

आहे खूप खूप मानाचा


पाऊस पडता चैतन्य दिसे

पाऊस नसता निरसता भासे


पाऊस वाटे सर्वांना हवाहवा

पाहिजे तो प्रत्येक गावागावा


पाऊसरुपी आनंदघन येतो

सारा निसर्ग मोहरुन जातो


रिमझिम रिमझिम बरसती धारा

नवजीवन मिळते चराचरा


मनामनाला मोहवी पाऊस 

त्यात भिजायची साऱ्यांना हौस


पाऊस आहे अन्नब्रह्माचा निर्माता

आहे सर्वांचा खूप खूप आवडता


वाट पाहते पावसाची सारे शिवार

तृप्त होई भूमी पडता त्याचे तुषार


पाऊस येता हिरवा शालू लेई धरा

सर्वत्र वाही सुख समृद्धीचा झरा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational