STORYMIRROR

Govind Ghag

Inspirational

3  

Govind Ghag

Inspirational

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
216

आज पावश्या ओरडत सुटला

पाऊस येणार अस सांगू लागला!

वादळ सुटल आभाळ भरल

काळ्या ढगांनी पडदा धरला!!

पाऊस आला पाऊस आला!!१!!


वादळ सुटल आभाळ भरल

गाव सारा अंधारात बुडाला!!

पाखरांचा थवा घरटी परतत

जनावरांचा गोठा गुरांनी भरला!!

पाऊस आला पाऊस आला!!२!!


कोकीळेने कुहूकुहू स्वर आळवला

मोरांनी केकावलीने ताण खेचला!

वारा बेभानपणे धावत सुटला

घरपत्र्यांचा ताशा तडतडू लागला!!

पाऊस आला पाऊस आला!!३!!


उर ढगांचा फुटुन वाहू लागला

थेंबांचा रपरप सडा पडू लागला!! 

थेंब धरतीच्या तप्त हृदयी शिरता

प्रीतीचा मृदूगंध दरवळून उठला!!

पाऊस आला पाऊस आला!!४!!


झाडे वेली उजळत हिरव्याकंच झाल्या

डोंगर,द-यातून धबधब्यांनी सूर मारला!!

ओढे,नाल्यांतून पाणयाचा लोंढा आला

बघता बघता पाण्याचा धूर झाला!!

पाऊस आला,पाऊस आला!!५!!


तो निसर्गाचा मृदगंध.दोन मिलनांचा£

जो धावे चराचरांची मने रीझवायला!!

बळीराजाच्या निराशेला घालवावयाला

आणि भविष्यातील स्वप्ने साकारायला!!

पाऊस आला, पाऊस आला!!६!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational