आशेचा किरण
आशेचा किरण
अंधारल्या दाही दिशा
काळोख जगी दाटला
सुटला वादळ वारा
सूर्य कसा झोकाळला ||१||
भरकटलेल्या वाटा
प्रकाश अंधारलेला
मनातील कोपऱ्यात
एक दुवा वसलेला ||२||
प्रयत्नांची पराकाष्ठा
मनात राहो तेवत
तारी कठीण समयी
तेच आपुले दैवत ||३||
सूर्य मावळला तसा
सांभाळ दिवा मनाचा
माणुसकीला जपण्या
हाच किरण आशेचा ||४||
