गुरुचे महत्त्व
गुरुचे महत्त्व
संदेश बहुमोलाचा
चार ओळीतुनी दिला
चैतन्याच्या प्रवाहाचा
कृपा प्रसाद लाभला ||१||
मरगळल्या जीवाला
स्पर्श लाभला तुमचा
खचलेल्या या मनाला
विश्वास लाभे तुमचा ||२||
योजना आखण्या आधी
बेभान असा जाहलो
पुरेशी ऊर्जा घेऊनी
नतमस्तक मी झालो ||३||
मज हवे ते मिळाले
तुमच्या आशीर्वादाने
समाधान हे लाभले
मज गुरूदर्शनाने ||४||
पाऊल पुन्हा एकदा
पडले पुढे जोशात
जीवनी पुन्हा एकदा
प्रयत्न घडे जोमात ||५||
गुरूचे महत्त्व मज
हरघडी जाणवते
प्रत्येक क्षणी मजला
जाणीव तुमची होते ||६||