रम्य ती भटकंती
रम्य ती भटकंती
रम्य ती भटकंती
रम्य तिची निरागसता,
घातले किती ही साकडे तरी
परतणार नाही ते क्षण आता,
छान ती सह्याद्री
किती छान ते डोंगरराव,
भटकंती करताना
सह्याद्रीच्या वाटेला भारी वाव,
भटकंती करताना सोबत घेतलेला
जेवणाचा डब्बा ही आठवतो,
आशीर्वादासाठी नजरेस पडलेला
गडकोटावरील दगडाचा देव ही आठवतो,
आठवते ती भटकंतीची मजा
चालताना आठवतो शिवबा राजा,
ज्याने स्वराज्याची स्थापना केली
आणि सुखी ठेवली आपली प्रजा,
फक्त उरल्या त्या मनी आठवणी
भटक्यांना सह्याद्रीचा मोठा हेवा,
लॉकडाउन लवकर संपू दे आणि
भटकंती सुरु होऊ दे रे आता देवा...
