STORYMIRROR

भटकंतीकार स्वराज्याचे शिलेदार कवी.स्वहित कळंबटे

Inspirational

3  

भटकंतीकार स्वराज्याचे शिलेदार कवी.स्वहित कळंबटे

Inspirational

शिव सह्याद्री

शिव सह्याद्री

1 min
208

शिव सह्याद्री म्हणजे

आहे तरी नक्की काय,

इतिहासाची खरी ओढ

रुजवते ज्या ठायी ती पाय,


350 वर्ष होऊनी सुद्धा

आज ही ती अमर आहे,

स्वराज्याचा इतिहास तो

प्रत्येक जण डोळ्याने पाहे,


धन्य आई जिजाऊ माता ती

स्वराज्याला पुत्र असा दिला,

शिवाजी नाव ठेऊनी त्यासी

रयतेचा राजा तो शूर लाभला,


लढला तो पुत्र आईचा

रयतेच्या खऱ्या सुखासाठी,

बारा जातींचे लोक होती

शेवटच्या श्वासापर्यंत पाठी,


ते गडकोट हेच आपले

आहेत शिवइतिहासाचे सोने,

म्हणून आज अभिमानाने 

निसर्गास शिव सह्याद्री म्हणे.....


Rate this content
Log in

More marathi poem from भटकंतीकार स्वराज्याचे शिलेदार कवी.स्वहित कळंबटे

Similar marathi poem from Inspirational