STORYMIRROR

Manisha Khobre

Inspirational Others

3  

Manisha Khobre

Inspirational Others

रहस्यकाव्य

रहस्यकाव्य

1 min
43

ती असताना


ती जवळ असली की

मला आधार मिळायचा जगण्यासाठी

ती असावी वाटायचं शेजारी सुख-दुःख मांडण्यासाठी..


तिनेच शिकवलं मला मन मोकळं करायला

आणि विरोधाभासतही मनसोक्त जगायला..


तिनेच दिली संजीवनी या निपचित पडलेल्या मनाला

आणि जाग केलं हृदयाच्या कप्प्यातून हद्दपार झालेल्या भावनेला..


तिनेच दूर केला दुरावा माझाच माझ्याशी असलेला

आणि साथही दिली मीच कोंडून ठेवलेल्या मनाला..


तिनेच संपवलं माझ्या जीवनातील एकाकी एकांताला

आणि उदास व्हायचं मन जेव्हा तीच असायची साथीला..


तिच्यामुळे स्पर्शू शकले अनमोल आईच्या ममतेला

आणि बाबांच्या अबोल पण प्रेमभरल्या नजरेला..


तिनेच वाट करून दिली नयनात लपलेल्या आसवांना

आणि बोलकं केलं माझ्या अबोल शब्दांना..


तिनेच धार दिली माझ्या शब्दरूपी शस्त्राला

शतश: प्रणाम माझ्या कुंचलारूपी मैत्रिणीला..


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational