Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Khobre

Tragedy

2  

Manisha Khobre

Tragedy

सौंदर्य विचारांचे

सौंदर्य विचारांचे

4 mins
12


आज सखू जरा दररोजच्यापेक्षा लवकरच उठली होती. लगबगीनं पटापटा आपली कामं उरकत होती. तिच्या झोपडीवजा घराचं अंगण शेणाने सारवून झाले होते. त्यावर रांगोळी रेखाटून रंग भरले होते. शेजारीच असलेले तुळशी वृंदावन घराची शोभा वाढवत होते. त्यात नुकतीच तारूण्यात आलेली तुळस रविकराच्या दर्शनासाठी अधीर झाली होती. सखूने देवपूजा आटोपून तुळशीला पाणी घातले. घरात-दारात धूप-दिपाचा घमघमाट पसरला. फुलांचा सुगंध दरवळू लागला.


सखूने स्वयंपाकघरात जाऊन कुकर लावला. ओल्या कुंतलांशी चाळे करणारा टॉवेल दारातील दोरीवर टाकला आणि कमरेपर्यंत लोळणाऱ्या केसांना सावरत दर्पणासमोर गेली. गौरवर्णी चेहरा, चाफेकळी नाक, हरणासारखे डोळे, ओठ जणू फुललेल्या गुलाब पाकळ्या, गालावर तरंगणारी नाजूक खळी, निमुळती हनवुटी आणि रूंद कपाळावर रूळणाऱ्या कुंतलांच्या कुरळ्या बटा तिच्या तारूण्यात भर घालत होत्या. सखू काही क्षण स्वत:च्या सौंदर्याला न्याहाळू लागली. कुकरच्या शिट्टीने ती भानावर आली. रविकरही दर्शन देण्याच्या तयारीत होते. तिने जवळच बेडवर झोपलेल्या राजेशला हलक्या आवाजात उठवण्याचा प्रयत्न केला. राजेशही विचारात पडला, रोज तोंडावर पाणी फेकून उठवणारी सखू आज शांत!! त्याने अर्धवट उघड्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले. तिच्या सौंदर्याचा तो आधीच दिवाणा होता, आज ती अधिक सुंदर भासली. त्याने तिला हळूच ओढून बाहुपाशात घट्ट धरले. गालावर ओठ टेकवून तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला. पण तिला बोचणारे शल्य मनात तसेच राहिले. काही क्षण गेले, पुन्हा कुकरने शिट्टी दिली, ती भानावर आली. सखूच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. तिने पुन्हा काही क्षण स्वत:ला राजेशच्या स्वाधिन केले. शांत डोळे मिटून घेतले आणि म्हणाली, 'उठाल का आता? उशीर होईल निघायला.' राजेशची पकड ढिली झाली. सखूने उठून कुकर उतरवून चहा चढवला.


राजेशला आंघोळला पाणी देऊन बाहेर गेली. दिवसभर चांडाळ चौकडी करणाऱ्या, दुसऱ्यांच्या घरात डोकावणाऱ्या, सखूला नावे ठेवणाऱ्या हातात खराटा घेऊन डोळे चोळत घराबाहेर आल्या. सखूचं अंगण पाहून, आज काय विशेष महाराणीचं? सखूच्या लक्षात आले. तशी ती सुस्वभावी, कोणाच्या अध्यात नाही की मध्यात... पण काही उगीच जळायच्या तिच्यावर. पण सखू तोंडाने जरा फटकळ होती. ती चटकन मोठ्याने बोलली, सकाळच्या वेळी शेणाने अंगण स्वच्छ केले जाते तर काही जण शेण खाऊन तोंड का म्हणून घाण करत असतील? तसा आपापाल्या दारात खराटा फिरवून त्या आत गेल्या.


जिंकलेल्या मुद्रेने सखू आत आली. दोघांनी चहा घेतला. भाजी-पोळी तयार केली. राजेशचंही आवरून झालं. दोघांनी जणू अबोला धरला होता, आज गप्पच होते. सखूने कपडे धुवून वाळत टाकले. 'आठ वाजले आवरून झालं का?' राजेश बोलला. दोघांनी एकाच ताटात जेवण उरकले. लाडवाचा डब्बा, वरणभात, भाजी-पोळीचा डब्बा तिने एका पिशवीत व्यवस्थित ठेवला. राजेशने नवीन कपड्यांची पिशवी कपाटातून बाहेर काढली. पाण्याची बाटली पिशवीत ठेवली. सखूने सुंदर साडी नेसली. हलकासा मेकअप केला. मोकळे केस बांधून घेतले पण राजेशने ते मोकळे केले आणि म्हणाला, 'असेच राहू दे छान दिसतात.'


'अहो पण,' सखूला त्याने बोलूच दिले नाही. दोघे बाहेर पडले. दरवाजाला कुलूप लावून निघाले.


त्यांना १० वाजून ३० मिनिटांनी रेल्वे मिळणार होती. पण ते अर्धा तास अगोदरच निघाले. थोडं‌ चालून जाताच वाईट मन, नजर, विचार घेऊन फिरणारी भिंगरी (स्त्री) वाटेत दिसली. जिला दोन सुना, जावई, नातवंडे आलेली पण अक्कल नाही. नेहमी दुसऱ्याचा विचार, चांडाळ चौकडी, निंदा नालस्ती, बुराई करणार. दुसऱ्याला नखशिखांत पाहणार आणि जळणार. एक नंबरची हावरट पैशाची लालची, पैशाची घमंडी आणि महत्त्वाचं म्हणजे सखूची जणू हितशत्रू.


आणि आज तर सखूची साडी, मेकअप, मोकळे केस पाहून तिला दमच निघेना. लगेच जवळचीच्या कानात कुजबुजली. आज जवळची रमा मात्र बोलली, अगं माले, तू का सखूवर जळती...


अगं पण तिचे केस बघ.


रमा, अगं माले तुझी सून नागडी हिंडायची वेळ आली. तिचे केस, तिचे कपडे आम्हाला माहिती नाहीत का गं? तुझी मुलगी कशी राहते माहिती आहे. तू का सखूच्या मागे लागती? मालीनं रमीचा भांडून पिंड पाडला. बिचारी सखू ऐकून गप्प बसली. दोघेही खजिल झाले.


चालू लागले. एवढ्यात एक काळी मांजर त्यांना आडवी गेली. पण आज तिचा कुठल्याही प्रकारचा अपशकून सखू वाटला नाही. आपला सुखी संसार आणखीन सुखी करण्यासाठी ती जणू राजेशच्या संगतीने झपाझप पावले उचलत चालू लागली. कसली तरी चाहूल तिला लागली आणि तिने कानोसा घेत बाजूला नजर टाकली. पण कोणी दिसले नाही. पण कोणीतरी पाठलाग करत असेल बहुतेक. ते रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तिकीट घेतले. काही वेळात रेल्वे आली व प्रवास सुरू झाला. कशीबशी एक जागा सखूला मिळाली. तिच्या शेजारी एक महिला आपल्या मुलांना घेऊन बसली होती. एक मांडीवर शांत झोपी गेले होते. आणि दुसरे अर्धे मांडीवर नि अर्धे खाली पायावर लोंबकळत होते. अंगावर कपडेही अर्धवटच होते. मध्येच दचकून वर सरकायचा प्रयत्न करत होते. ती बाई मात्र निश्चिंत भासली. सखू नुसती बघत राहिली. मनात अनेक विचारांचे काहूर माजले होते. तिला प्रसंग सतावत होते. डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.


तिला तो एक प्रसंग किती महागात पडला होता. आठवणीने ती बेचैन झाली. थरथरू लागली. गाल, नाक लाल झाले, मन हेलावून गेले, डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.

      

रेल्वे स्टेशन आले. गाडी येणार होती कांहीं मिनिटांत. आज राजेश आणि सखू वेगळ्याच सुख-दुःखाच्या भोवऱ्यात गुंतले होते. ते एका नवीन विचारसरणीला आकार देणार होते. लग्न होऊन सात वर्ष झाली होती पण त्यांना मुल नव्हते आणि काही शारीरिक दोषांमुळे होणारही नव्हते. म्हणून ते एका काम करून जगणाऱ्या कुटुंबातील मुलीला दत्तक घेण्यासाठी निघाले होते.


सौंदर्य हे दिसण्यात नाही तर विचारात असेल तेव्हा संपूर्ण जीवनच खुलून जाते. जसे सखू आणि राजेशचे खुलणार आहे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy