जिजाऊ
जिजाऊ
जाधवांची लेक
भोसल्यांची सून
गुणवंत नेक
जिजाऊ महान
शहाजींची भार्या
शुर हुशार ती
पेरते ती शौर्या
मराठी संस्कृती
स्वप्न शहाजींचे
स्वतंत्र नगर
पुण्यात सोन्याचे
रोवले नांगर
पाजीयले पाणी
सत्याचे शिवास
भवानीची भक्ती
आलीया फळास
बालकडू दिले
स्वतंत्र मराठी
राज्याचे शिवाले
वाचवण्यासाठी
जिजाऊंनी कथा
शिवाच्या मनात
कोरल्याच व्यथा
बाल स्वरूपात
संस्कार मढले
पराक्रमी शुर
शिवाजी घडले
दिली दृष्टी दूर
गावकऱ्यांसह
शिवा खेळू दिले
जेवले त्यांसह
मावळे जन्मले
संवगडी मित्र
त्यांची सुखदुःख
याची जाण मात्र
शिवाजी तू राख
अशी ही माऊली
स्त्री अत्याचाराने
जी हळहळली
एकले शिवाने
परस्त्री रक्षणा
धावला शिवबा
स्त्री मातेसमान
मानला शिवबा
संस्कार तोरण
रायगड्यावर
बांधले कायम
स्वराज्य रक्षण
नाती संभाजीस
माया ममतेने
उब दिली खास
शिक्षण जातीने
ढाल तलवार
घेवून हातात
खेळली ही नार
शंभू समवेत
चौकस नजर
हि रूबाबदार
मनात निर्धार
न मानली हार
कणखर राणी
होती जी मानिनी
जीजाची कहाणी
स्वराज्य स्वामिनी