STORYMIRROR

स्वतःच्या युद्धाच्या पाऊल खुणा....

स्वतःच्या युद्धाच्या पाऊल खुणा....

1 min
5

हरलो जरी कधी मी
तरी नव्याने पेटूनी उठेन,
शिखर उंच असली स्वप्नांची
तरी ती मी जिद्दीने गाठेन,

एकटा पडलो जरी आज मी
लढेन स्वतःच स्वतःसाठी,
कोणी देणार नाही घास मुखी
धडपडेन मी स्वतःच्या पोटासाठी,

काळ बदला हा नव्याने सारा
नात्यांनी घेतले खरे रुप संकटा वेळी,
कोणीच नसते कुणाचे जीवनी
सावराव लागत स्वतःलाच दुःखाच्या वेळी,

जन्म घेता डोळ्यास दिसते दुनिया
जगता जगता अनुभवाने समजते खरी,
स्वतःच्या अडचणीवर मात करण्यापायी
जिंदगी ही आनंदात जगायची राहते सारी,

श्वासात श्वास हा शक्तीचा तो मार्ग
एकटा पडलो जरी थांबणार कधीच नाही,
जगणार पेटवून जिद्दीची आग खरी
उमठवणार पाऊळखुणा स्वतःच्या युद्धाच्या काही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from भटकंतीकार स्वराज्याचे शिलेदार कवी.स्वहित कळंबटे

Similar marathi poem from Action