STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Action Children

4  

Trupti Thorat- Kalse

Action Children

पुन्हा वाजू वाजू लागली शाळेची घंटा....

पुन्हा वाजू वाजू लागली शाळेची घंटा....

1 min
224

पुन्हा वाजू लागली शाळेची घंटा

मिटला आता घरात होणारा 

आम्हा भावंडांचा तंटा


आधी नको वाटायची जी शाळा

आता लॉकडाउन मध्ये 

खूप आठवला तो काळा फळा


आई तशी रोज-रोज नवीन पदार्थ करून

खाऊ घालतच होती; 

पण खरी गोडी मात्र मित्रांच्या घोळक्यात 

डब्बा खाण्यात होती.


सुरवातीला online शाळा भारी वाटली

नंतर-नंतर मात्र वर्गातल्या बेंच ची 

आठवण येऊ लागली.


Online शाळेची घंटा काही वाजेना

अन अभ्यास आमचा काही केल्या

उरकेना


पुन्हा वाजू लागली शाळेची घंटा

आई म्हणाली होईल आता माझी

सुटका निदान काही घटका


पुन्हा वाजू लागली शाळेची घंटा

आम्ही पण झालो आनंदी पुन्हा

भेटू सर्व मित्र कित्येक दिवसांनी एकत्र


पुन्हा वाजू लागली शाळेची घंटा टॅन...टॅन...टॅन

नाही आली उत्तर नीट देता

तर बाई देतील छडी छन..छन...छन.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action